साहित्य नसल्याने तीन डिजीटल लिटरसी बंद

सॉफ्टवेअर तसेच इतरही यंत्रणा झाली कालबाह्य 

पुणे – प्रशिक्षणासाठी आवश्‍यक असलेले साहित्य नसल्याने महापालिकेने डिजीटल इंडीया अंतर्गत बसेसमध्ये सुरू केलेली 3 डिजीटल लिटरेसी सेंटर बंद ठेवण्यात आली आहे. महापालिकेने 6 बसेसमध्ये ही केंद्रे सुरू केली होती. मात्र, त्यासाठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर तसेच इतर यंत्रणा कालबाह्य झाल्याने ही केंद्रे बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेने केंद्र शासनाच्या डिजीटल इंडीया या योजनेंतर्गत शहरात 100 ठिकाणी डिजीटल लिटरसी सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्या अंतर्गत महापालिकेने पीमपीच्या सहा बसेसमध्ये सुधारणा करून त्यात मोबाईल डिजीटल लिटरसी सेंटर उभारली होती. या सेंटरद्वारे शहराच्या वेगवेगळ्या भागांत जाऊन त्या भागांतील नागरिकांना सलग दहा दिवस प्रत्येक दिवशी दोन तास या प्रमाणे 20 तासांचे प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, त्यातील 3 बसेसमधील संगणकीय साहित्य आऊट डेटेड झाल्याने महापालिकेने हे साहित्य खरेदी होईपर्यंत ही केंद्रे बंद ठेवली आहेत. ही साहित्य खरेदी अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसांत ही बंद केंद्रे सुरू केली जाणार असल्याचे माहिती आणि संगणक विभागाच्या अधिकारी राहुल जगताप यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)