साहित्य जागर- दिवंगत साहित्यिकांच्या आठवणींना उजाळा

पुणे- मराठी साहित्याला दीर्घ परंपरा आहे. हजारभर वर्षात अनेक लिहीते लोक होऊन गेले. त्यातील काही लोक ठळक झाले, तर काही लोक काळाच्या पडद्याआड गडप झाले. अशा साहित्यिकांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अक्षरधारा बुक गॅलरी व अक्षरमानव आयोजित साहित्यजागर हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी करणार आहेत. त्यामध्ये त्या महिन्यात निवर्तलेल्या साहित्यिकांच्या आठवणी त्यांचेच नातेवाईक, अभ्यासक, वाचक गप्पा मारतील असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. येत्या 1 एप्रिलला मार्च महिन्यात निवर्तलेल्या म्हणजेच गौरी देशपांडे, ह. ना. आपटे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, रणजित देसाई, विंदा करंदीकर, सुरेश भट, वि. वा. शिरवाडकर, बा. सी. मर्ढेकर, श्री. ना. पेंडसे, संत तुकाराम, ग्रेस इत्यादी साहित्यिकांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांचे नातेवाईक, अभ्यासक येणार आहेत. रश्‍मी तुळजापूरकर (मर्ढेकरांची नात), अजित जाधव (मर्ढेकर अभ्यासक), जयश्री काळे (विंदांची मुलगी), अविनाश सांगोलेकर, प्रदीप निफाडकर (सुरेश भट अभ्यासक), भास्कर हांडे (संत तुकारामांचे अभ्यासक), इंदुमती जोंधळे, महावीर जोंधळे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम दि. 1 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता बाजीराव रस्त्यावरील कुसुमाग्रज वाचककट्टा, अक्षरधारा बुक गॅलरी येथे होणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)