साहित्यविश्‍व: शांता शेळके

व्यंकटेश लिंबकर

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळवणारी तिसरी लेखिका म्हणजे शांता शेळके (ऑक्‍टोबर 12, 1922 – जून 6, 2002). शांत शेळके या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बालसाहित्य लेखिका आणि पत्रकार होत्या. शांता शेळके यांचा जन्म 12 ऑक्‍टोबर 1922 साली पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला. शिक्षण पुण्यात (हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय येथे) झाले. आचार्य अत्र्यांच्या नवयुग’ मध्ये 5 वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले.

-Ads-

अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोलाची भर घातली आहे. शांता शेळके या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या, तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य होत्या.
कथा-कादंबरीसह साहित्याच्या सर्व क्षेत्रांत मुशाफिरी करणाऱ्या शांताबाईंच्या नावावर 100 हून अधिक पुस्तके आहेत. शांताबाईच्या पुस्तकांत येडबंबू शंभू, सारखी बालकविता, “पावसाआधीचा पाऊस’ सारखे ललितरम्य लेख, असे वैविध्य सापडेल. गीतकार म्हणून त्यांनी जगण्याचा मोठा पट कवेत घेतलाच, पण ललितलेखांतूनही त्या व्यक्त होत राहिल्या.

एकपानी, किंवा पाऊसा आधीचा पाऊस, सारखे लघुनिबंध संग्रह, किनारे मनाचे, हे त्यांच्या निवडक कवितांचे संकलन कालिदासाच्या मेघदूताचा अनुवाद, हायकू, त्यांनी लिहिलेली चित्रपटगीते, त्यांच्या लेखणीतून उमटणारे सामाजिक, सांस्कृतिक स्थित्यंतरांचे पडसाद असे बरेच काही मागे ठेवून त्या गेल्या. वर्षा, गोंदण, पूर्वसंध्या, इत्यर्थ (काव्यसंग्रह), धर्म, पुनर्जन्म (कादंबऱ्या), अनुबंध मुक्‍ता, प्रेमिक (कथासंग्रह) वडीलधारी माणसे (व्यक्‍तिचित्रे) धूळपाटी (आत्मपर), मेघदूत, जपानी हायकू (अनुवाद) अशी बहुविधा त्यांनी लीलया हाताळली. आळंदी येथे 1996 साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)