साहित्यविश्‍व: गोदावरी परूळेकर 

व्यंकटेश लिंबकर 

गोदावरी परुळेकर (14 ऑगस्ट, 1908 – ऑक्‍टोबर 8, 1996) (माहेरचे नाव- गोदावरी गोखले) या भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, व मराठी लेखिका होत्या. साम्यवादी संघटनांसोबत काम करणाऱ्या गोदूताईंनी डहाणू परिसरातील आदिवासींच्या वेठमुक्ती-लढयाचे वास्तव मांडणारे जेव्हा माणूस जागा होतो’ हे पुस्तक लिहिले, तर बंदिवासाची आठ वर्षे’ हे त्यांचे पुस्तक कैदेतील स्त्रियांच्या कहाण्या सांगते. वर्ष 1972 चा साहित्य अकादमी पुरस्कार गोदावरी परुळेकर यांच्या ‘जेव्हा माणूस जागा होतो’या पुस्तकासाठी जाहीर झाला होता. जेव्हा माणूस जागा होतो’ हे पुस्तक समाजाबद्दल असलेल्या माणसाच्या भूमिकेविषयी भाष्य करते.

वर्ष 1912 मध्ये ना. म. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी परुळेकर यांनी मानद सहाय्यक सचिव म्हणून कामगारांच्या शिक्षणप्रसाराच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली. गिरगावपासून परळपर्यंतच्या भागात ठिकठिकाणी नागरिकांना वर्तमानपत्रे वाचण्यासाठी केंद्रे सुरू केली. त्यामुळे लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली व त्यांना शिक्षणाची गरज वाटू लागली. याच सुमारास 1917 मध्ये चिंचपोकळी येथे वाचनालय सुरू केले. त्यावेळी 11 ग्रंथालये व 10 वाचनालये मोफत चालविली जात. जेव्हा माणूस जागा होतो – डहाणू परिसरातील आदिवासींच्या लढ्याचे वास्तव मांडणारे पुस्तक अत्यंत वाचनीय असे आहे.

त्यांचे बंदिवासाची आठ वर्षे – कैदेतील स्त्रियांच्या कहाण्या सांगणारे पुस्तक अतिशय गाजले होते.

पश्‍चिम महाराष्ट्रातील आदिवासी क्षेत्रात मार्क्‍सवादी पक्षाचे काम गोदावरी परूळेकर व त्यांचे पती ऍड. श्‍यामराव परूळेकर यांनी अथकपणे केले. ठाणे जिल्ह्यातील वारल्यांना संघटित करून त्यांचा सावकारांच्या शोषणातुन बचाव करणे. हे अवघड काम गोदावरी परूळेकरांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)