“साहब, बिबी और गुलाम 3′ बघितल्यावर चित्रांगदा रडली

“साहब, बिबी और गुलाम 3′ रिलीज होऊन एक आठवडा होऊन गेला. सुरुवातीपासूनच सिनेमाचा थिएटर परफॉर्मन्स खूपच खराब होता. आठवड्याभरानंतरही सिनेमाला अद्याप प्रेक्षकांचा काहीच प्रतिसाद मिळू शकलेला नाही. आता चित्रांगदामुळे हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

“साहब, बिबी…’मध्ये चित्रांगदा लीड रोलमध्ये आहे. तिच्या रोलमध्ये खूप छेडाछेड केली गेली आहे, हे प्रत्यक्ष सिनेमा बघताना तिच्या लक्षात आले. हा धक्का तिच्यासाठी अनाकलनीय होता आणि त्यामुळे ती रडायलाच लागली. तिच्या मते डायरेक्‍टरने सिनेमात तिच्याइवजी माहि गिलच्या रोलला जास्त महत्व दिले आहे. माहि गिल ही देखील या सिनेमात लीड रोलमध्ये आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चित्रांगदा ही संजय दत्तची हिरोईन होती. पण सगळे क्रीम फुटेज मिळाले ते मात्र माहि गिलला. कारण काहीही असो, पण सिनेमा बॉक्‍स ऑफिसवर सपाटून आपटला आहे, ही बाब आता नाकारता येत नाही. दोन आठवड्यांच्या परफॉर्मन्सनंतरही सिनेमाने बॉक्‍स ऑफिसवर जेमतेम मुद्दल वसूल केले आहे. माहि गिलला या सिनेमाकडून किती अपेक्षा होत्या किंवा नव्हत्या माहिती नाही. पण आपल्या नावावर एक फ्लॉप सिनेमा नोंदवला गेला, याचे चित्रांगदाला मात्र खूप वाईट वाटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)