सासू-सासऱ्यासह मेव्हण्यास 3 वर्षे सक्तमजुरी

रेठरे येथील घटना : जावयावरील ऍसिड हल्लाप्रकरणी चार वर्षानंतर निकाल

कराड – मौजे रेठरे, ता. कराड येथील संजय लक्ष्मण सावंत यांनी गावातीलच बाळासो खिल्लारे यांच्या मुलीशी विवाह केला. याचा राग मनात धरीत सासू, सासरे व मेव्हण्याने जावयाच्या अंगावर ऍसिड ओतून हल्ला केल्याची घटना 23 सप्टेंबर 2014 रोजी यात्रेत घडली होती. याप्रकरणी युक्तीवाद होवून आरोपी असलेले सासू, सासरे व मेव्हणे यांना कराड न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रवींद्र गवई यांनी 3 वर्षाची सक्त मजुरी व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फिर्यादी संजय लक्ष्मण सावंत यांनी रेठरे गावातीलच आरोपी बाळासो खिल्लारे यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला होता. याचा राग खिल्लार कुटुंबियांच्या मनात होता. त्यामुळे यांच्यामध्ये वारंवार वादही होत होते. दि. 23 सप्टेंबर 2014 रोजी रेठरे गावची यात्रा असताना फिर्यादी संजय सावंत हा आरोपीचे घरासमोर राहणारे त्याचे भावाचे घरी उंबऱ्यावर बसलेला असताना सासरे बाळासो नारायण खिल्लारे यांनी जावयास तु इथे का आलास, तुला गावात येऊ नको म्हणून सांगितले होते. असे म्हणून थांब तुला बघतोचफ असे म्हणून आपले घरात जावून पत्नी व मुलासोबत ऍसिडचा कप घेऊन आले. व फिर्यादीचे तोंडावर, हातावर, छातीवर ऍसिड फेकले. तसेच सासूने जावयाच्या डोक्‍यात फळी मारली होती. सदरच्या हल्ल्यात संजय सावंत यांचा चेहरा, हात व छातीचा बराचसा भाग ऍसिडने जळालेला होता. सदरच्या हल्ल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल केलेले होते.

या प्रकरणाची फिर्याद जखमी संजय लक्ष्मण सावंत याने कराड तालुका पोलीस स्टेशन येथे दिली होती. सदर फिर्यादीवरुन दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास बी. जी. पाटील, पोलिस उपनिरीक्षक यांनी करुन दोषारोपपत्र कोर्टात सादर केलेले होते. सदर केसचे कामी सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील सुर्यकांत बी. पोवार यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले.

सरकारी वकील सूर्यकांत पोवार यांनी केलेला युक्तीवाद व वैद्यकीय पुरावा ग्राह्य मानून कराड न्यायालयाचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी रवींद्र गवई यांनी जावई सावंत यांचे सासू, सासरे व मेव्हणे या सर्व आरोपींना भारतीय दंड विधान संहीता कलम 326, 324 प्रमाणे 3 वर्षे सक्त मजुरी आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच सदर दंडाचे रक्कमेतील रुपये 25 हजार रक्कम फिर्यादीस उपचाराकरीता आलेल्या खर्चासाठी नुकसानभरपाई म्हणून देणेचे आदेश दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)