सासवड सरकारच्या नावाने जागरण गोंधळ

सासवड- सकल मराठा समाजाच्या वतीने गुरूवारी पासून सासवड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी सरकारला जाग यावी यासाठी सरकारच्या नावाने जागरण गोंधळ घालण्यात आला. तसेच मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यास स्व. दत्तात्रय शिंदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पुरंदर तालुका सकल मराठा समाजातर्फे पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी व सासवडचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुगुटलाल पाटील यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनामुळे सासवड शहरात शुकशुकाट होता. संपूर्ण पुरंदर तालुक्‍यासह सासवड शहर आज शंभर टक्के बंद राहिले. शहरातील दुकाने, हॉटेल, पेट्रोल पंप, भाजी मंडई व किरकोळ विक्रेत्यांची दुकाने बंद होती. शहरातील शाळा व महाविद्यालये बंद होती. जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत रोज सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरू राहणार आहे. तालुक्‍यातील प्रत्येक गावातील मराठा समाज बांधव चक्रीय आंदोलन करणार आहेत.
मराठा समाजाने आजपर्यंत फक्त देण्याचेच काम केले आहे. मात्र, संख्येने बहुसंख्य असलेल्या या समाजाला आपल्या न्याय व हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागते हीच मोठी शोकांतिका आहे. सरकारने मराठा समाजाच्या सहनशिलतेचा अंत पाहु नये, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)