सासवड शहरास होणार दोन दिवसाआड पाणीपुरवठा

सासवड- शहरास गराडे जलाशयामधून होणारा तसेच जलाशयाखालील विहिरीतून होणारा पाणीपुरवठा थांबला आहे. सिद्धेश्वर जलाशयातून यावर्षी पाणी घेता न आल्याने शहरास घोरवडी व वीर जलाशयातून पाणीपुरवठा होत आहे. घोरवडी जलाशयातून शहरास मिळणारे 15 लाख लिटर पाणी सध्या पुरंदरचे तहसीलदार अतुल म्हेत्रे यांनी टंचाई म्हणून राखीव ठेवल्याने ते पाणी शहरास बंद झाले आहे. त्यामुळे शहरास दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.

घोरवडी जलाशयावर बाकी गावे अवलंबून असल्यामुळे तसेच पुरंदर तालुक्‍यात दुष्काळी परिस्थिती असल्याने तेथील पाणी राखून ठेवण्यात आल्याने सासवड नगपरिषदेने पाणी बंद घेणे बंद करावे व वीरचे पाणी वापरावे, असे पाटबंधारे विभागाने पत्राद्वारे कळविले आहे. तरीही घोरवडीचे 15 लाख लिटर पाणी मिळण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने तहसीलदारांकडे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. वीर धरणाच्या पाण्यावर यापुढे अधिक अवलंबून रहावे लागणार असल्याचे स्पष्ट झाल्याने सध्या वीर धरणातून 24 तासांत अपेक्षित 45 लाख लिटर एवढा पाणीपुरवठा होत आहे.

घोरवडी जलाशयाचे 15 लाख लिटर पाणी बंद झाल्याने शहराचा पाणीपुरवठा लवकरच दोन दिवसाआड करावा लागल्याची माहिती पाणीपुरवठा समितीचे सभापती संजय जगताप व नगरपरिषद प्रशासनाचे वतीने देण्यात आली. सध्या सासवडला पाणीपुरवठा करणाऱ्या उद्‌भवांपैकी तीन उद्‌भवांचे पाणी बंद झाले असून फक्त वीर धरणातून पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे आगामी काळात शहरात त्याची तीव्रता वाढण्याची शक्‍यता आहे.

घोरवडी धरणातून सासवड नगरपालिकेला केला जाणारा पाणीपुरवठा अचानक बंद केला गेला आहे. त्यामुळे सासवडकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. घोरवडी धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यामागे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा काही संबंध तर नाही ना अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)