सासवड येथे 9 ऑगस्ट पासून बेमुदत धरणे आंदोलन

जेजुरी- जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन सुरू राहणार असून पुढील काळात लढा अधिक तीव्र करण्यात येणार आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने 9 ऑगस्ट पासून सासवड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत. अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत व समन्वयक संदीप जगताप यांनी दिली.
सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. 5) जेजुरी शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये पुरंदर तालुक्‍यातील विविध गावांमधील 100हुन अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये 9 ऑगस्ट पासून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी तालुक्‍यातील प्रत्येक गावांना एक दिवस ठरवून देण्यात येणार आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान देणाऱ्या पिंगोरी गावच्या कै. दत्तात्रय शिंदे यांच्या कुटुंबियांना तातडीने दीड लाख रुपयांची मदत करण्याचे जाहीर करण्यात आले. त्यांच्या पत्नी किंवा भाऊ यापैकी एक व्यक्तीला सरकारी नोकरीत सामावून घेण्यासाठी व आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे संदीप जगताप सांगितले.
आत्महत्येचा मार्ग अवलंबू नका
राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार आहेत आणि आपणही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. लोकशाहीच्या मार्गाने कायदा व सुव्यवस्थेला बाधा न आणता आपण लढा सुरूच ठेवणार आहोत. मात्र, कुणीही आत्महत्या किंवा आत्मघातकी कृत्यांचा अवलंब करू नये. आई, वडील, पत्नी, मुले अवघ्या परिवाराची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे समाज बांधवांनी आत्महत्या करू नये. असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत यांनी केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)