सासवड येथे सलग चौथ्या दिवशी आंदोलन

सासवड, दि. 12 (प्रतिनिधी) – मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सासवड येथील शिवतिर्थावर सलग चौथ्या दिवशी आंदोलन करण्यात आले. रविवारी वाल्हेकरांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
मराठा आरक्षणासाठी सासवड येथे आंदोलन सुरू आहे. आंदोलनासाठी तालुक्‍यातील प्रत्येक गावाला एक दिवस ठरवून दिला आहे. रविवारी वेल्हा येथील मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पहिल्या दिवशी सासवडकरांनी एल्गार केल्यानंतर दुसरा दिवस जेजूरी, तिसऱ्या दिवशी निरा येथील समाजबांधवांनी आंदोलन केले. सोमवारी (दि. 13) भिवरी येथील समाज बांधव ठिय्या आंदोलन करणार आहेत. आंदोलकांनी जिल्ह्याच्या ठिकाणी विद्यार्थी वसतीगृह बांधण्याबरोबरच ई बी सी फी सवलतीची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)