सासवड-यवत रस्त्यावरील नवीन चौक बनतोय मृत्युचा सापळा

सासवड- सासवड-यवत रस्त्यावरील वनपुरी (ता. पुरंदर) येथील नवीन चौक मृत्युचा सापळा बनला आहे. या ठिकाणी तीव्र उतार असल्यामुळे झेंडेवाडीकडून भरधाव वेगाने येणारी वाहने दिसत नाहीत. तसेच या भागात काटेरी झुडपे वाढलेली असल्यामुळे रोज अपघात होत आहेत.
सासवड (ता. पुरंदर) ते यवत (ता. दौंड) या दोन तालुक्‍यांना जोडणारा सासवड- यवत रस्ता व नव्यानेच झालेल्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील झेंडेवाडी ते जेजुरी रस्त्यामुळे वनपुरी गावाजवळ चौक तयार झाला आहे. या चौकात झेंडेवाडीकडून भरधाव वेगाने वाहने येतात. सासवड ते यवत रस्त्यावर या ठिकाणी तीव्र उतार असल्यामुळे झेंडेवाडीकडून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे आतापर्यंत 10 ते 15 अपघात झाले आहेत. तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देण्यास तयार नाही. जर विभागाने वेळेत ही समस्या सोडविली नाही तर मोठा अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
या ठिकाणी गेल्या वर्षभरात आठ ते दहा वेळा अपघात झाले असून आतापर्यंत दोन तरूणांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे वेगावर मर्यादा आणण्यासाठी या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी वाहन चालक करीत आहेत. तसेच चौकात सूचना फलक लावण्याबरोबरच राटेरी झुडुपे काढणे गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)