सासवड तहसील कार्यालयासमोर धोकादायक रोहित्र

सासवड- सासवड येथील महावितरणचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आला असून मागील अनेक दिवसांपासून तहसील कार्यालयासमोरील रोहित्र (डीपी) धोकादायक स्थितीत आहे. डीपीच्या फ्युज बॉक्‍सचा दरवाजा कायमच उघडा असल्यामुळे कधी ही मोठी दुर्घटना घडू शकते.
सासवड न्यायालय व तहसील कार्यालयासमोरील मोकळ्या मैदानातील महावितरणचे रोहित्र सध्या अतिशय धोकादायक व असुरक्षित स्थितीत असल्याचे दिसून येते. डीपीच्या आजूबाजूला कमरेभर उंचीचे गवत वाढलेले असून डीपीला वेली व झुडपांनी वेढलेले आहे. तसेच या ठिकाणच्या फ्युज बॉक्‍सचे दार कायम उघडे असते. डीपी वरती मोठ्या प्रमाणात वेली वाढल्यामुळे व आजूबाजूच्या गवतामुळे डीपी बॉक्‍सचे दार उघडे असल्याचे लक्षात येत नाही. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यता आहे. महावितरणचे अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष देऊन रोहित्राच्या आजूबाजूचे गवत, झाडे, झुडपे काढून बॉक्‍सचे दार कायमचे बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सासवड हे तालुक्‍यातील मुख्य ठिकाण असल्यामुळे तहसील कार्यालय व न्यायालयीन कामकाजात करीता तालुक्‍यातील नागरिकांची कायमच वर्दळ असते. महसुली व न्यायालयीन कामकाजा करीता आलेल्या नागरिकांची वाहने याच भागात लावलेली असतात. त्यामुळे चुकून एखाद्याचा वीजवाहक तारांना स्पर्श होऊन मोठी दुर्घटना होऊ शकते. तसेच आजूबाजूला लावलेल्या वाहनांचे ही नुकसान होऊ शकते. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे कानाडोळा करणे बंद करावे व त्वरित या रोहित्राची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)