सासवड-जेजुरी रस्त्याव दुचाकीस्वाराचा मृत्यू

काळदरी – सासवड-जेजुरी रस्त्यावरील खळद गावच्या हद्दीतील सुभेदार वस्तीजवळ झालेल्या पिकअप आणि मोटरसायकलच्या अपघातात सासवड येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 28) रात्री साडेआठच्या सुमारास घडला. आकाश चंद्रकांत रासकर (वय 31) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत शशिकांत दत्तात्रय रासकर (रा. खळद, ता. पुरंदर) यांनी सासवड पोलीस ठाण्यात याबाबत खबर दिली आहे. याबाबतचे वृत्त असे सासवडवरून बारामतीकडे निघालेली पिकअप (एमएच 42 एम 6849) खळद हद्दीत आली असता त्यावेळी जेजुरीवरून सासवडकडे येणाऱ्या दुचाकीस (एम एच 12 ई ई 2389) जोरात धडक दिल्याने या अपघाता दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. आकाशच्या मागे आई-वडील आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. सासवड येथील तलाठी कांता रासकर यांचा आकाश हा एकुलता एक मुलगा होता. सासवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार रवींद्र काळभोर पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)