सासवडला 19 ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबिर

जवळार्जून- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 19 ऑगस्ट रोजी सासवड येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पुरंदर तालुक्‍यातील 10 हजार 500 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. नायगाव येथे 8 ऑगस्ट सकाळी 9 वाजता जिल्हा परिषदेचे सदस्य रोहीत पवार यांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन केले आहे. याशिवाय कोळविहिरे येथे सकाळी 10.30 वाजता, वाळूंज येथे दुपारी 12 वाजता, वाघापूर येथे दुपारी 2 वाजता, परिंचे येथे दुपारी 4 वाजता, कोडीत येथे सांयकाळी 5.30 वाजता व जेजुरी येथे सायंकाळी 7 वाजता शिबिराचे आयोजन केले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रसचे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिक झेंडे पाटील यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)