सासवडला 19 ऑगस्टला महाआरोग्य शिबिर

नीरा- पुणे जिल्हा परिषद, सासवड नगरपालिका व पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 19 ऑगस्ट रोजी सासवड येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी केले आहे. सोमवारी नीरा ग्रामपंचायतीच्या जेष्ठ नागरिक सभागृहात महाआरोग्य शिबीराचे नियोजन करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिक झेंडे पाटील, सरपंच दिव्या पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, दत्ता चव्हाण, अनिल चव्हाण, पृथ्वीराज काकडे, कांचन निगडे, बापू पाटोळे, सुजाता जाधव, युवक उपाध्यक्ष अभय थोपटे, धर्मराज चव्हाण, मनोज शहा, डॉ. सतीश खलाटे, सुरज कोरडे, रियाज पठाण, प्रकाश कदम, नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. तेजल बोराटे आदी उपस्थित होते. 19 ऑगस्टला सासवड येथील वाघेरी कॉलेजच्या प्रांगणात होणाऱ्या महाआरोग्य शिबिरात सर्व प्रकारच्या रोगांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. तसेच आवश्‍यते नुसार औषधे देखील देण्यात येणार आहेत. नागरिकांच्या सुविधेसाठी नीरा येथून सासवड येथे जाण्यासाठी बससेवा उपलब्ध केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)