सासवडला वाघिरे महाविद्यालयात पुस्तक दिन साजरा

नायगाव-सासवड येथील वाघिरे महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वाचनाने माणूस समृद्ध होतो आणि त्यासाठी वाचनाची आवड असणे आवश्‍यक असते. हा दिवस वाचन, प्रकाशन आणि कॉपीराईट याला प्रोत्साहन मिळावे, यासाठी साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे आणि त्यांनी वाचन करावे या उद्देशाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे महाविद्यालयामध्ये जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. यावेळी लोणी महाविद्यालयाचे डॉ. गोपीनाथ बोत्रे, वाघीरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राध्यापक नारायण टाक, ग्रंथपाल दत्तात्रय संकपाळ उपस्थित होते. डॉ. नारायण टाक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, वाचनाने माणूस समृद्ध होतो. व्यक्तिचित्रे वाचण्याचा सल्ला दिला. पुस्तकांच्या रूपाने आपण न अनुभवलेल्या गोष्टी अनुभवू शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लोणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपीनाथ बोत्रे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजाऊन सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना भरपूर वाचन करा आणि स्वतःच्या नोट्‌स तयार करा असा सल्ला दिला. जगभरातील अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना जाधव यांनी तर प्रा. दिपक जांभळे यांनी आभार मानले. त्यानंतर विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)