सासवडला मराठा समाजाचे 48व्या दिवसी आंदोलन

सासवड- सासवड येथील शिवतीर्थावर सुरू असलेल्या पुरंदर तालुका सकल मराठा समाजाच्या बेमुदत ठिय्या आंदोलनास मंगळवारी (दि. 25) तब्बल 48 दिवस पूर्ण झाले. बेलसर (ता. पुरंदर) गावच्या मराठा बांधवांनी बैलगाडीतून येऊन शिवतीर्थावर शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहत मराठा आरक्षणाची मागणी केली.
स्व. अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणा करिता पहिले बलिदान केले होते.त्यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. एक मराठा लाख मराठाचा जयघोष करून शिवतीर्थ दणाणून सोडले. यावेळी आंदोलकांनी जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन बेमुदत असेच चालू ठेवण्याचा निश्‍चय केला आहे.
बेलसर गावच्या तरुण मुली व मुलांनी आपल्या मनोगतातून सरकारचा निषेध करत मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली. सरकार दरबारी मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. न्यायप्रविष्ट बाब असल्याचे सांगून मुख्यमंत्री आरक्षणाबाबत वेळकाढूपणा करीत आहेत. मराठा समाजातील बहुसंख्य मराठा बांधवांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती हेच आहे. सरकार एकीकडे मराठा समाजाला आरक्षण देत नाही तर दुसरीकडे शेतीमालाला बाजारभावही देत नाही. पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. सरकारच्या या गळचेपी धोरणामुळे मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना आरक्षणाला अभावी शासकीय नोकरी मिळत नाही. दुसरीकडे शेती करणे ही तोट्याचे झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)