सासवडला भजन स्पर्धा उत्साहात

सहकार महर्षी स्व. चंदूकाकांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजन

सासवड- सहकारमहर्षी स्व. चंदुकाका जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त बोपगाव भजनी मंडळ आणि चंदूकाका जगताप मित्र परिवाराच्या वतीने सासवड येथील संत सोपानकाका महाराज मंदिराच्या प्रांगणात दोन दिवस भजन स्पर्धांचे आयोजन केले होते. पुरंदर-हवेलीतील भागवत संप्रदायातील अनेकांनी हजेरी लावून या भजन स्पर्धेचा आनंद घेतला. आजच्या तरूणाईला टी.व्ही., इंटरनेटकडे आणि मोबाईल या अनावश्‍यक वस्तुंनी भुरळ घातली असून बहुतांश तरुणाई पाश्‍चिमात्य संस्कृतीकडे वळत चालली असताना पुरंदरमध्ये सांप्रदायिक चळवळीला बळ देण्याचे काम स्व. चंदूकाका जगताप मित्र परिवाराने केले आहे, असे प्रतिपादन आळंदीचे संगीताचार्य गंभीर महाराज यांनी बक्षीस वितरण कार्यक्रमात केले.
बोपगाव भजनी मंडळाचे ह.भ.प. सुनील फडतरे, ह.भ.प. दत्तात्रय फडतरे, बाळासाहेब फडतरे, प्रशांत गुरव, सुदाम फडतरे, संदीप फडतरे तसेच चंदूकाका जगताप मित्र परिवाराचे प्रकाश पवार, रविंद्र जगताप, अनिल उरवणे, सतीश शिंदे, दीपक जगताप, कानिफनाथ आमराळे आदींनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या स्पर्धेत जवळपास 150 भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता. ह.भ.प. बंडोपंत खामकर व गंभीर महाराज यांनी परीक्षण केले.
विजेत्यांना प्रत्येकी हार्मोनियम, मृदंग, वीणा देण्यात आले. तसेच प्रथम क्रमांक 11 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 9 हजार रुपये, तृतीय क्रमांक 7 हजार रुपये, चतुर्थ क्रमांक 5 हजार रुपये आणि पाचव्या क्रमांकास 3 हजार रुपये रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात आले. तसेच प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भजनी मंडळ किंवा संघांना 9 टाळजोड संत सोपानकाका बॅंकेचे अध्यक्ष संजय जगताप, सोपानदेव ट्रस्टचे गोपाळ गोसावी, पंचायत समितीच्या सदस्या सुनीता कोलते, प्रदीप पोमण आदींच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

  • स्पर्धेतील विजेते संघ पुढीलप्रमाणे
    स्वरसाधना भजनी मंडळ (गुऱ्होळी), द्वितीय क्रमांक श्रीकृष्ण भजनी मंडळ (सासवड), तृतीय क्रमांक श्री सिद्धेश्वर भजनी मंडळ (नायगाव), चतुर्थ क्रमांक सूरसंगम बाल भजनी मंडळ (कुंभारवळण) आणि पाचवा क्रमांक गणेश भजनी मंडळ (वडकी).
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)