सासवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ठिय्या आंदोलन

सासवड- मराठा आरक्षणासाठी पुरंदर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सासवड येथे सलग दुसऱ्या दिवशी ठिय्या आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी जेजुरी येथील मराठा समाज बांधव व भगिनींनी शिवतीर्थावर शेकडोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवित आरक्षणाची मागणी केली.
मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. पुरंदर तालुका सकल मराठा समाजाने 9 ऑगस्ट पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तालुक्‍यातील प्रत्येक गावास एक दिवस ठरवून दिलेला आहे. आज (दि. 10) रोजी जेजुरी येथील समाज बांधवांनी आंदोलन केले. आंदोलकांनी सनई वादन, भजन या माध्यमातून सरकारला मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याची सद्बुद्धी देण्याचे साकडे देवाला घातले. 11 ऑगस्ट रोजी निरा येथील समाज बांधव आंदोलन करणार आहेत.
सरकार जाणून बुजून मराठा आरक्षण संदर्भात दप्तर दिरंगाई करीत आहे. तसेच सरकार मधील मंत्री व आमदार जनतेत असंतोष वाढेल अशा पद्धतीची वक्तव्य करत असल्याचे मत यावेळी आंदोलकांनी व्यक्त केले. जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही तोपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
5 :heart: Love
6 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
14 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)