सासवड – सासवड शहरातील शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मोठया उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेतील इयत्ता 10वी व 12वी च्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे काम मोठया जबाबदारीने पार पाडले. कार्यक्रमाची सुरुवात परिपाठाने झाली. त्यानंतर सर्व शिक्षकांच्या भूमिका कोण-कोण साकारणार याची माहिती देण्यात आली. यावेळी सर्व शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार विद्यार्थ्यांनी केला. कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा आनंदी जगताप, सचिव संजय जगताप, सहसचिव डी. एन. गवळी, प्राचार्या रेणुका सिंग मर्चंट, उप प्राचार्या सुषमा रास्कर, जनसंपर्क अधिकारी अमोल सावंत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)