सासवडमध्ये ग्रामदेवताच्या मूर्तींची मिरवणूक

  • तुतारीचा निनाद, गुलालाची उधळण ः महिलांनी केले औक्षण

सासवड – पारंपरिक वाद्यांचा गजर, ढोल ताशा आणि तुतारीचा निनाद, गुलालाची उधळण आणि विविधरंगी फुलांच्या सजावट केलेल्या पालखीतून ग्रामदेवताची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी समस्त सासवडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलांनी ठिकठिकाणी मूर्तीला औक्षण करण्यात आले, मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.
सासवड (ता. पुरंदर) येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरातील उत्सव मूर्तींचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. नवीन तयार करण्यात आलेली मूर्ती पंचधातूपासून बनविण्यात आली आहे. शनिवारी (दि. 12) दुपारी मूर्ती सासवडमध्ये आल्यानंतर नगरपालिका चौकातील छत्रपती शिवाजी पुतळा येथे विविधरंगी फुलांच्या सजावट केलेल्या पालखीमध्ये ठेवण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात फटाक्‍यांची आतषबाजी केली.
यावेळी श्री काळभैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष अनिल लांडगे, उपाध्यक्ष उत्तम जगताप, चैत्री उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गिरमे, उपाध्यक्ष रमेश वामन जगताप, सचिव दिनकर जगताप, कार्याध्यक्ष सखाराम लांडगे, लेखापरीक्षक शामराव जगताप, विश्वस्त संग्राम जगताप पाटील, माजी उपाध्यक्ष राजाभाऊ जगताप, विश्वस्त रमेश राजाराम जगताप, सुधाकर गिरमे, ज्ञानेश्वर जगताप, नंदकुमार दिवसे, त्र्यंबक जगताप, जयवंत जगताप, रवींद्र जगताप, रामदास इनामके, चंद्रकांत गिरमे, सुधाकर बोरावके, विलास जगताप, मोहन जगताप, सुभाष हिवरकर, सुरेश जगताप, दत्तात्रय जगताप, मंदिराचे पुजारी राजेंद्र भैरवकर, गणेश भैरवकर, मोहन भोंगळे त्याचप्रमाणे मंदिराचे इतर ट्रस्टी, पालखीचे मानकरी, खांदेकरी, विश्वस्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान रविवारी (दि. 13) सकाळी 6 वाजता मूर्तींची महापूजा करण्यात येईल. त्यानंतर होमहवन आणि त्यानंतर प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. तसेच उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)