सासवडमध्ये गोमांसाची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

सासवड- येथील सासवड जेजुरी महामार्ग जवळील श्रीनाथ चौकात सरसेनापती हंबीरराव मोहिते गोरक्षक दल व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने गोमांसाची वाहतूक करणारा टेम्पो पकडला. पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात कारवाई केली आहे. बारामतीतून पुण्यातील कॅम्प भागात विक्रीसाठी गोमांस नेले जात होते.
सासवड-जेजुरी महामार्गावरून पुण्याच्या कॅम्प भागात नेहमी गोमांसाची वाहतूक केली जात होती. त्यामुळे कार्यकर्त्यांने यावर नजर ठेवली होती. बारामती येथून दहा ते बारा गाय व बैल कापून त्याचे मांस कातडींसह भरून एका अशोक लेलॅंड टेम्पोतून (क्रमांक एम एच एक 12 एलटी 526) कॅम्प पुणे येथे घेऊन जात असल्याची खात्रीशीर माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने सासवड येथील श्रीनाथ चौकात टेम्पो पकडला. याप्रकरणी जुनेद इस्माईल कुरेशी व फिरोस इस्माईल शेख (दोघेही रा. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात गोरक्षकांनी फिर्याद दिली आहे. या कारवाईत गोरक्ष दिपक गोरे, ऋषिकेश कामथे, महेश पवार, सुरज भगत यांनी विशेष परिश्रम घेतले. या घटनेचा अधिक तपास सासवड पोलीस करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)