सासवडमध्ये आढळले प्रेत सापडले

सासवड – सासवड (ता. पुरंदर) येथे मंगळवारी (दि. 2) किर्लोस्कर कंपनीच्या जवळ एका अनोळखी महिलेचे मुंडके नसलेले प्रेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेचे वय अंदाजे वीस ते पंचवीस वर्षे असून धारदार हत्याराने त्यांचा खून करण्यात आला आहे. अंगामध्ये गुलाबी रंगाची सोनेरी झालरचे नक्षीकाम केलेली साडी आहे. हाताच्या पंजाच्या मागील बाजूस मराठीमध्ये “बंतो खयाली’ असे गोंदलेले आहे. तसेच मयताच्या गळ्यामध्ये अर्धवट तुटलेली काळे मण्याची पोत व दोन्ही पायांमध्ये पांढऱ्या धातूच्या पट्ट्या आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सासवडचे पोलीस निरीक्षक एम. बी. पाटील हे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)