सासवडमधील सरकारी कामे ठप्प

सासवड- सासवड (ता. पुरंदर) मधील राज्य सरकारी कर्मचारी आज (दि. 7) संपावर होते. सातव्या वेतन आयोगासह 2005 पासूनची जुनी पेन्शन योजना लागू करावी, आदी मागण्यांसाठी आज (दि. 7) पासून तीन दिवसांच्या संपावर जाण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला होता.
पुरंदर तालुक्‍यातील नारायणपूर आणि भिवडी वगळता सर्व केंद्रातील शाळा 100 टक्‍के बंद होत्या, तसेच ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी आणि द्वितीय श्रेणी कर्मचारी यांनी देखील संपात शंभर टक्के सहभाग नोंदवला. सर्व कर्मचारी संघटनांच्या वतीने एकत्रित येऊन गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे यांना निवेदन देण्यात आले .
सातवा वेतन आयोग लागू करणार, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या वेळी दिले होते, त्यानुसार जानेवारी महिन्यापासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. गणेशोत्सवापूर्वी महागाई भत्त्याची थकबाकी देण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले होते. आजही संप टाळण्यासाठी दिवसभर प्रयत्न सुरू होते; परंतु तोडगा निघाला नाही. राज्य सरकारी कर्मचारी समन्वयक संघाची बैठक आज झाली. या बैठकीत संप मागे न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. जानेवारीपर्यंत थांबण्यास नकार देताना सातवा वेतन आयोग तत्काळ लागू करावा, अशी ठाम भूमिका घेत संपावर जाण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी घेतला. सरकारने अनेक वेळा आश्‍वासन दिले तरी अजूनही सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही, ही आमची फसवणूक आहे. त्यामुळे संपावर जावे लागते आहे, असे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. या संपात तहसील कार्यालय, पंचायत समिती, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा ठप्प होणार, अशी चिन्हे आहेत.

 


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)