सासवडमधील शिवतीर्थावर बोंबा मारो आंदोलन

  • मराठा आरक्षणासाठी सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन

सासवड – पुरंदर तालुका सकल मराठा मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी शनिवारी शिवतीर्थावर सरकारच्या विरोधात बोंबा मारो आंदोलन करण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी सासवड येथे आंदोलन सुरू आहे. आंदोलनासाठी तालुक्‍यातील प्रत्येक गावाला एक दिवस ठरवून दिला आहे. शनिवारी नीरा येथील मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सरकारच्या विरोधात बोंबा मारत आरक्षणाची मागणी केली. पुरंदर तालुक्‍यातील मराठा समाजाच्या वतीने सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन करण्यात येत आहे. सरकारने सत्तेत येण्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्याच आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेत येऊन चार वर्षे उलटून ही सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. या आंदोलनाला पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी यांनी भेट दिली. रविवारी वाल्हे येथील सकल मराठा बांधव आंदोलन करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)