सासवडच्या लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षकाला पकडले

गराडे – सासवड न्यायालयात संदिप बाळकृष्ण होले यांच्यावर गुन्ह्यातील दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात आरोपीला जामीन मिळविण्यासाठी मदत करण्यासाठी एक लाख रूपयांची लाच स्विकारताना सासवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद काशिनाथ पालवे ( वय 42) व एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी श्रीकांत बाळासो ताम्हाणे (वय 29) यांना लाच घेताना सासवडजवळील एखतपूर येथे गुरुवारी (दि. 28) रात्री 11:00च्या सुमारास लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. संदिप बाळकृष्ण होले याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीन मंजूरीसाठी मदत करण्यासाठी लोकसेवक पालवे यांनी दीड लाखांची मागणी केली, त्यातील एक लाख रुपये श्रीकांत ताम्हाणे याने घेत पदाचा गैरवापर केला. गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन केले म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे लाचलुचपत विभागातील पोलीस उपअधिक्षक फिर्यादी प्रतिभा प्रल्हाद शेंडगे यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)