सासऱ्याचे 9 लाख मिळवण्याच्या नादात गमावले 1 कोटी 68 लाख

सासऱ्याचे 9 लाख मिळवण्याच्या नादात गमावले 1 कोटी 68 लाख
पुणे,दि.17 – सासऱ्याची 9 लाख फंडाची रक्कम मिळवण्याच्या नादात एका महिलेने 1 कोटी 68 लाख 11 हजार रुपयांची रक्कम गमावली. याप्रकरणी विविध संस्था व अज्ञात मोबाईल धारक महिलांविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात बुधवार पेठेत रहाणाऱ्या एका 50 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही रक्‍कम 2013 पासून आजवर देण्यात आली होती.
फिर्यादी महिलेस 2013 मध्ये एका कंपनीतून कॉल आला होता. कॉल करणाऱ्याने तुमच्या सासऱ्याचा 9 लाख रुपयांचा फंड असून त्या फंडाची रक्कम तुमच्या खात्यात जमा करायची असल्याचे सांगितले. यासाठी पॉलीशी व एनओसी काढून , इन्कम टॅक्‍सही भरावयास लागेल असे पटवून दिले. यानंतर त्यांच्याकडून विविध कारणे सांगून रोख, सोन्याच्या स्वरुपात तसेच आरटीजीएसव्दारे 1 कोटी 68 लाख 11 हजार 619 रुपये लाटण्यात आले.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी यांच्या खात्यातून आरोपींच्या खात्यात पैसे वर्ग झाल्याच्या नोंदी आहेत. त्यांनी दोन ते तीन खात्यामध्ये हे पैसे वर्ग केल्याचे दिसत आहे. तर त्यांना वेगवेगळी नावे घेऊन 12 मोबाईल नंबरवरुन कॉल आले होते. गुन्हयात एकूण 34 जणांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक यश सुर्यवंशी करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)