सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

पिंपरी – सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेने ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना चिखली नेवाळेवस्ती येथे घडली.

कोमल प्रवीण देवकर (वय 21, रा. नेवाळेवस्ती, चिखली) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी सुनील भाऊसाहेब आसबे (वय-45, रा. आसबेवाडी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती प्रवीण भारत देवकर (वय-25), सासरे भारत सोपान देवकर (वय-55), सासू सजाबाई (वय-47), महादेव मोरे (वय-45) आणि सुवर्णा महादेव मोरे (वय-40) या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोमल हिचा प्रवीणसोबत काही दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. माहेराहून पैसे आणावेत म्हणून जाच केला. तसेच पैसे चोरल्याचा आळ घालून शिवीगाळ करत मारहाण केली. यामुळे हताश झालेल्या कोमलने आत्महत्या केली. फौजदार रत्ना सावंत तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)