सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पुणे,दि.23-सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना वारजे येथे गुरुवारी घडली. याप्रकरणी पती सुशिलकुमार शंकर बोंबले, सास, सासरे आणी नणंदेविरुध्द वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुजल सुशिलकुमार बोंबले(33,रा.उरीटनगर, वारजे) असे आत्महत्या करण्यात आलेल्या विवाहितेचे नाव आहे. सुजल व सुशिलकुमार यांचा 2010 मध्ये विवाह झाला होता. तीचा सन 2015 पासून मुलबाळ होत नसल्याच्या कारणाने छळ करण्यात येत होता. तसेच तीच्या पतीचे एका महिलेबरोबर प्रेमसंबंध होते. यामुळे तीचा पती, सासू, सारसे आणी नणंद छळ करत होते. तीला सातत्याने माणसीक व शारीरीक छळ करण्यात येत होता. या छळास कंटाळून तीने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एम.जी.त्र्यंबके करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)