सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या

उरुळी कांचन – सासरच्या छळाला कंटाळून कोरेगाव मूळ (ता.हवेली) येथील माया शरद मोरे (वय 25, रा.कोरेगाव मूळ ता.हवेली, जि. पुणे) हिने राहत्या घरी शनिवारी (दि.24) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत फिर्याद प्रकाश सोपान बेलुसे यांनी पोलिसात दिली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोरेगाव मूळ येथील दासवेवस्तीवर माया शरद मोरे ही पती शरद भीवा मोरे, सासू जनाबाई भीवा मोरे, भरत भीवा मोरे, शीतल भरत मोरे कुटुंबासह राहत होती. पती शरद भीवा मोरे यांच्यावर कर्ज झाल्यामुळे मोरे कुटुंबीय माया शरद मोरे हिला माहेररून 50 हजार रुपये आणावे, म्हणून नेहमी मारहाण करीत असत. परंतु, ती पैसे घेऊन येत नाही म्हणून घरातील इतर मंडळी मोठ्या प्रमाणात त्रास देत होती.शेवटी तिला त्रास सहन होईना म्हणून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती उरुळी कांचन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक बंडोपंत कौंडभैरी यांना दिली. या घटनेचा तपास उरुळी कांचन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवलेसह सचिन पवार, सोमनाथ चित्तारे, शशीकात पवार हे करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)