सासपडे येथे चोरी

नागठाणे  – सासपडे (ता. सातारा) येथे अज्ञात चोरट्याने बंद घराची कौले उचकटून 43 हजार रुपये चोरून नेल्याचे घटना मंगळवारी दुपारी घडली. याची फिर्याद महिबूब महिद्दीन गवंडी यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. महिबूब गवंडी हे सासपडे येथे भाड्याच्या घरात रहातात. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे मजुरीसाठी घरातून बाहेर पडले. तर त्यांच्या पत्नी, आई व दोन मुले हे पाखाळणीसाठी पाली येथे गेले.

दुपारी 4.30 च्या सुमारास पत्नी घरी आली. त्यांनी कुलूप उघडून आत प्रवेश केला असता घरातील साहित्य अस्तव्यस्त पडलेले व दोन्ही कपाट उचकटलेले आढळले. त्यांनी लगेच पती महिबूब गवंडी यांना फोन करून घरी बोलावले. यावेळी घराची कौले उचकटून ठेवलेली आढळून आले. अज्ञात चोरट्याने कौले काढून घरात प्रवेश करून दोन्ही कपाटातील सुमारे 43 हजार रुपयांची रोकड लंपास केली. बोरगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास साहाय्यक फौजदार भीमराव यादव करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)