सावेडीतील महावीरनगरमधील वेश्‍या व्यवसायावर छापा

तीन पीडित युवतींची सुटका : चालक महिलेसह तिघांना अटक

नगर – सावेडीतील महावीनगरमध्ये रत्नप्रभा बंगल्यात सुरू असलेल्या वेश्‍या व्यवसायावर तोफखाना पोलिसांना आज रात्री साडेआठ वाजता छापा घातला. पोलिसांनी तीन पीडित युवतींची सुटका केली आहे. दोन पुरूष आणि चालक महिलेसह, तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस कर्मचारी मंगेश खरमाळे यांच्या तक्रारीनुसार तोफखाना पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना खबऱ्यामार्फत सावेडीतील महावीरनगरमधील एका बंगल्यात वेश्‍या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी उपअधीक्षक मिटके यांच्याशी चर्चा करून कारवाईचे नियोजन केले. उपअधीक्षक मिटके, पोलीस निरीक्षक शिंदे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक पूनम पाटील, पोलीस कर्मचारी रामेश्‍वरी पांढरे, दीपक रोहोकले, सलीम शेख, रोहिणी मंडलिक यांनी या रत्नप्रभा नावाच्या बंगल्यावर छापा घातला.

पोलिसांनी चार महिला व दोन पुरूषांना येथून ताब्यात घेतले. चालक महिलेने सुरूवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिली. पुरूषांना नातेसंबंध सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी तेथून जप्त केलेल्या साहित्यावरून येथे वेश्‍या व्यवसाय होत असल्याचे समोर आले. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यावर पीडित तीन युवतींपैकी दोन परप्रांतीय आहेत. त्यांना फूस लावून येथे आणण्यात आल्याचे प्राथमिक चौकशी पुढे येत आहे. पोलिसांनी वेश्‍या व्यवसाय महिला चालक आणि दोन पुरूष या तिघांविरोधात पिटातंर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)