सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम तातडीने मार्गी लावा

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी चौकात उभारलेले सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम तातडीने मार्गी लावण्याच्या सुचना महापौर राहुल जाधव यांनी दिल्या. पुर्णत्वाचा दाखल मिळाल्यानंतर, या इमारतीचे भूमी जिंदगी विभागाकडे हस्तांतर करुन ही कामे अभ्यासिका व ग्रंथालय पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे आदेश दिले.

सावित्रीबाई फुले स्मारक समिती सदस्यांनी महापौर जाधव यांची भेट घेत, स्मारकाचे रेंगाळलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली होती. या स्मारकात अभ्यासिका, सुसज्ज ग्रंथालय, महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग, महात्मा फुले पुतळ्यास मेघडंबरी करण्याच्या मागण्या केल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर महापौर राहूल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवक, समिती पदाधिकारी व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक गुरुवारी (दि.4) महापौर दालनात पार पडली. त्यावेळी नगरसेवक संतोष लोंढे, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, सहायक आयुक्त मंगेश चितळे, प्रभाग अधिकारी आशादेवी दुरगुडे सावित्रीबाई फुले स्मारक समितीचे चंद्रकांत डोके, आनंदा कुदळे, काळुराम गायकवाड, संतोष जोगदंड, हनुमंत माळी, सुरेश गायकवाड, गिरीष वाघमारे, गुलाब पानपाटील, वैजनाथ शिरसाट, नंदा करे, संगिता आहेर, विलास गव्हाणे, कोंडीबा जाधव, सुखदेव खेडकर, बाळासाहेब भालेकर आदी उपस्थित होते.

शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या या इमारतीचा पूर्ण क्षमतेने वापर सुरु करण्यासाठी येत्या आठ दिवसांत रेंगाळलेली कामे प्रशासनाने मार्गी लावा. पुण्यातील ब्रिटीश लायब्ररीच्या धर्तीवर या इमारतीमध्ये सुसज्ज ग्रंथालय सुरू करण्यासाठी रखडलेले फर्निचरचे काम पूर्ण करुन, दर्जेदार ग्रंथसंपदा व साहित्य खरेदी करण्याचे आदेश महापौर जाधव यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)