सावित्रीबाई फुले स्मारकात ग्रंथालयाची मागणी

पिंपरी – सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये बहुउपयोगी ग्रंथालय उभारावे, अशी मागणी ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

समितीचे अध्यक्ष आनंदा कुदळे, चंद्रकांत डोके, सुरेश गायकवाड, वैजनाथ शिरसाट यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महापौर राहुल जाधव यांना याबाबत निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महात्मा फुले पुतळ्या समोरील कारंजे दुरुस्त करावेत व रोज त्याचा वापर करावा. येथे विद्युत रोषणाई करावी. येथे येणाऱ्या नागरिकांच्या सोईसाठी स्वच्छतागृह, पाण्याची टाकी, बसण्यास बेंच, साहित्य ठेवण्यासाठी स्टोअर रुम बांधावी. पुतळ्या समोरील उद्यान आणि पुतळ्याकडे येणाऱ्या रस्त्यावर दिशा दर्शक फलक उभारावेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्पर्धा परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ब्रिटीश लायब्ररीच्या धर्तीवर ग्रंथालय उभारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. येत्या 28 नोव्हेंबरला महात्मा फुले यांचा स्मृतीदिन आहे. तत्पूर्वी मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)