सावित्रीबाई फुले विद्यालयाचे तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत यश

ओतूर – जिल्हा क्रीडा अधिकारी आणि क्रीडा शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले. बेल्हे येथील समर्थ विद्यालयात स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.
यश संपादन केलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे : 25 ते 30 वजनगट प्रथम स्वरांजली अस्वार, प्रांजल अवचार, 45 ते 50 वजनगट प्रथम सानिका गिजरे, 36 ते 40 वजनगट प्रथम अंकिता ठोंगिरे, 41 ते 45 वजनगट प्रांजल भोईर, 35 ते 40 वजनगट द्वितीय विराज अस्वार, 45 ते 50 द्वितीय काजल भोईर, खुलागट द्वितीय सलोनो वाकचौरे, 30 ते 35 वजनगट तृतीय रोहिणी दळवे, खुलागट तृतीय वैष्णवी चव्हाण, 25 ते 30 वजनगट द्वितीय दुर्गा नागमोते. प्रथम पाच क्रमांकाचे विद्यार्थ्यांची बारामती येथे होणाऱ्या जिल्हा पातळीवर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेतील यशस्वी आणि मार्गदर्शक शिक्षक रामदास डुंबरे तसेच कराटे प्रशिक्षक अरविंद थोरात यांनी अभिनंदन केले. तसेच संस्थेचे सचिव वैभव तांबे, विघ्नहर कारखान्याच्या संचालिका निलम तांबे, संस्थेचे उपाध्यक्ष श्रीहरी तांबे, प्राचार्य बशीर शेख, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)