सावित्रीबाई फुले यांचे कार्य आदर्शवत

जयंतीनिमित्त विविध संस्था, संघटनांकडून अभिवादन

पुणे – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 187 व्या जंयतीनिमित्त शहरातील विविध सामाजिक संस्थांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून गुरूवारी अभिवादन केले. “सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्यामुळेच आज समाजात मुलींना शिक्षणाचा हक्क मिळाला आहे. त्यांचे कार्य आजच्या काळातही आदर्शवत आहे.’ अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे संघटनेचे अध्यक्ष चेतन तुपे, शालिनी जगताप, समीर निकम, संदीप गाडे, अजिंक्‍य पालकर, शंकर शिंदे, राजेश शहा यांनी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे विजय डाकले,सचिन डाकले, वैजनाथ वाघमारे, संदीप गाडे, शंकर तेलंगे, वैभव जाधव, अजिंक्‍य पालक्‍जर, निलेश वरे यांनी अभिवादन केले.

सामाजिक समरतसता मंचातर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कसबा भागाचे सहसंघचालक ऍड. प्रशांत यादव, मंचाचे मकरंद ढवळे, संदीप गानू, श्रीनिवास गोणे, नीलेश अडागळे यांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.

दलित युवा संघर्ष समितीतर्फे प्रदेशाध्यक्ष सुधीर नेटके, रमेश गायकवाड, विकास सातारकर, अश्रू खवळे, चाणक्‍य नेटके, सखुबाई सांगळे, शनाज शेख यांनी, भाजप प्रभाग 17 तर्फे सागर शिंदे, निखिल जाधव, चेतन जाधव, राजेंद्र आबनावे, राहुल कोंढरे, किरण थोरवे यांनी,झोपडपट्टी सुरक्षा दलाच्यावतीने दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट, मोहम्मद शेख, काशिनाथ गायकवाड, सोनू तेलंग, जलसा वैराट, प्रदीप पवार, राजू परदेशी, दत्ता कांबळे यांनी, शिवसेवा भीमसेवा प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर कांबळे, वंदना कांबळे, राजेश पुरम, शाम भांबुरे, ऍड प्रशांत यादव , रोहित भोसले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याव्यतिरिक्त रिपब्लिकन जन-शक्ती, विलास चौरे समाजसेवा ट्रस्ट, पॅंथर्स रिपब्लिकन पार्टी, दलित महासंघ, रिपब्लिकन मातंग सेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ताडीवाला रस्ता विभाग, रिपब्लिकन संघर्ष दल, युवा वर्ग प्रतिष्ठान, कर्तव्य फाउंडेशन, प्रियदर्शिनी शिक्षण संस्था, पुणे शहर कॉंग्रेस क्रीडा सेल, पुणे शहर कॉंग्रेस कमिटी, पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी, पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी ओबीसी विभाग, कसबा ब्लॉक कॉंग्रेस कमिटी आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यावतीनेही अभिवादन करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)