सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट सर्वांनी अभ्यासावा- न्यायाधीश एम.व्ही.देशपांडे

 महिला वकिलांच्यावतीने फुले यांची जयंती साजरी

नगर: सर्वसामान्य महिला ते थोर समाजसुधारक पर्यंतचा सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट सर्वांनी अभ्यासावा. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत महिलांकरीता शिक्षणाची दारे खुली करुन त्यांनी केलेल्या महान कार्यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आघाडीवर असून, ताठमानेने जगत आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेले महान कार्याचे स्मरण करुन त्यांना अभिवादन करण्याचा उपक्रम स्त्युत्य आहे. जिच्याकडे कुठलेही बल नाही, तीच या जगाचे पालन करु शकते, हे त्याकाळी महात्मा ज्योतीबा फुले यांनी जाणले, म्हणूनच त्यांनी सावित्रीबाईंना सक्षम केले. त्यानंतर त्या पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका व महिला समाजसुधारक झाल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्त्रीचे महत्व आता वाढत आहे. महिला सक्षम झाल्यामुळेच प्रत्येक कुटूंब उभे आहे. यामध्ये सावित्रीबाईंचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश एम.व्ही.देशपांडे यांनी केले. जिल्हा न्यायालयात महिला वकिलांच्यावतीने वकिल संघटनेच्या महिला सचिव ऍड.गितांजली पाटील यांच्या पुढाकाराने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करुन महिला वकिलांकरीता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्हा न्यायाधीश श्रीमती एम.व्ही.देशपांडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन झाले. याप्रसंगी ऍड. गितांजली पाटील, वकिल संघटनेचे अध्यक्ष ऍड.शेखर दरंदले, उपाध्यक्ष ऍड.गजेंद्र पिसाळ, ऍड.शारदा लगड, ऍड.सुजाता गुंदेचा, ऍड.जया पाटोळे, ऍड.सविता साठे आदिंसह न्यायालयातील सर्व महिला न्यायाधिश उपस्थित होते.प्रास्तविकात ऍड.गितांजली पाटील यांनी सावित्रीबाईंच्या संषर्घमय जीवनपट उलगडला. त्या म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांनी चुल व मुल यामध्ये अडकलेल्या महिलेला सक्षम करुन शिक्षणाची दारे उघडली. त्यामुळेच आज आपण महिला सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहोत. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यांच्यामुळेच आज आपण ताठ मानेने जगत असल्याने त्यांचे स्मरण प्रत्येकवेळेस केले पाहिजे.

सूत्रसंचालन ऍड.अभय राजे यांनी केले, आभार ऍड.निलिमा औटी मानले. यावेळी न्यायाधीश के.एस.बकरे, न्या.के.व्ही. बोरा, न्या.आर.पी.परदेशी, न्या.के.के.पाटील, न्या.बी.एस.दरे, न्या.के.पी.राठोड, न्या.पी.पी. भारसकडे, न्या.एस.एस. पाटील, न्या.आर.आर. देशपांडे, न्या.के.एस.नावंदर, न्या.एस.पी.केस्तीकर, न्या.टी.एम.देशमुख, न्या.एस.डी.वडगावकर, न्या.एन.एस.सय्यद, न्या.व्ही.सी.देशपांडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऍड.मिनाक्षी कराळे, ऍड.संगीता पाडळे, शिल्पा बेरड, सुजाता पंडित, अंजली सुद्रीक, ऍड.कांचन चिपोळे, सुनेत्रा अनभुले, ऍड.लता गांधी, गिरीजा गांधी आदिंनी परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)