सावित्रीबाई फुले महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

ओतूर- येथील सावित्रीबाई फुले विद्यालय व सिताबाई तांबे कनिष्ठ महाविद्यालय व प्रतिभाताई पवार प्रशाला यांच्या संयुक्‍त विद्यामाने वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच साजरा करण्यात आला. याप्रसंगी तीन दिवस विविध गुणदर्शन कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गजानन महाराज शिक्षण मंडळाचे संचालक के. एस. पाटील, माजी विद्यार्थीनी शर्मिला घोडे, सुवर्णा धरमुडे, तेजस तांबे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. तेजस तांबे हिने विद्यालयाच्या नविन इमारत बांधकामासाठी 25 हजार, तर माजी विद्यार्थीनी सखुबाई बुळे यांनी पाच हजार जाहीर केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव वैभव तांबे हे म्हणाले की, स्व विलास तांबे यांनी लावलेले एवलेसे रोपटे आज आम्ही वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत. त्यांनी चालविलेला हा शिक्षणाचा वसा असाच पुढे चालू ठेवू. यावेळी संस्थेच उपाध्यक्ष श्रीहरी तांबे, विघ्नहर कारखान्याच्या संचालिका निलम तांबे, ओतूरचे सरपंच बाळासाहेब घुले, धनंजय डुंबरे, स्मिता डुंबरे, आशिष शहा, नितीन पन्हाळे, गुलाब डुंबरे, बाळासाहेब डुंबरे, विस्तार अधिकारी संजय जाधव, केंद्रप्रमुख बाळासाहेब भालेकर, प्राचार्य बी. जी. शेख उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)