सावित्रीबाईंचे विचार आजही प्रेरणादायी – प्रा. नागवडे

श्रीगोंदा: महात्मा जोतीराव फुलेंच्या सामाजिक कार्यात सावित्रीबाईंचा मोलाचा वाटा आहे. सावित्रीबाईंनी केलेले कार्य आणि त्यांचे विचार आजही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सोनिया गांधी तंत्रनिकेतनचे प्राचार्य अमोल नागवडे यांनी केले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विद्यार्थिनींच्या मेळाव्यात ते बोलत होते. प्राचार्य नागवडे म्हणाले, सावित्रीबाईंनी स्त्रीशिक्षण, विधवांचे पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंध गृह, अनिष्ठ प्रथा परंपरा निर्मुलनासाठी मोलाचे कार्य केले. या मेळाव्यात विद्यार्थिनींनी निर्भय बनण्याची शपथ घेत, येणारी आव्हाने पेलण्याकडे पाऊल टाकले.
यावेळी अनुजा नलगे व मनीषा राठोड यांची भाषणे झाली. संस्थेचे निरीक्षक एस.पी. गोलांडे, प्रा. पी.एन. गायकवाड, प्रा. एम.जी. काळे, प्रा. एन.जी. भोसकर आदी उपस्थित होते. प्रा. कानिफनाथ उगले यांनी सूत्रसंचलन केले तर, प्रा. मंगेश काळे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)