सावित्रीबाईंचे कार्य हा सामाजिक समतेचा आरसा : यशेंद्र क्षीरसागर

वाई – समकालीन परिस्थितीत सावित्रीबाईंचे विचार आणि कार्य अत्यंत मोलाचे असून त्यांचे अवघे जीवन हा सामाजिक समतेचा आरसाच आहे असे प्रतिपादन प्रमुख वक्ते यशेंद्र क्षीरसागर यांनी व्यक्त केले. वाई येथील नगरपालिका शाळा क्र. तीन आणि सात तर्फे आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा शिंदे उपनगराध्यक्ष अनिल सावंत आणि इतर मान्यवर तसेच फुलेनगरमधील ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्षीरसागर म्हणाले, बालविवाह केशवपन तसेच विधवा पुनर्विवाह कायदा या बाबतीतले फुले दांपत्याचे कार्य अद्वितीय आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रचंड सामाजिक विरोधाला छळाला न जुमानता त्यांनी मुलींचे व मागासवर्गाचे शिक्षण मोठ्या सहनशीलतेने सुरू ठेवले. सावित्रीबाई या महान आणि आद्य कवयित्री होत्या. काव्य फुले आणि बावनकशी सुबोध रत्नाकर हे त्यांचे काव्यसंग्रह अत्यंत दर्जेदार आणि सामाजिक भान असलेल्या भावनेने ओतप्रोत आहेत.

1876 चा दुष्काळ आणि नंतरची प्लेगची 1896 सालची साथ यामध्ये या दांपत्याने प्रचंड समाजसेवा केली असे सांगून ते म्हणाले वयाच्या केवळ 18 व्या वर्षी त्या भरतातील पहिल्या शिक्षिका झाल्या. त्यांनी प्रचंड खस्ता खाल्ल्या उपेक्षितांच्या कल्याणासाठी अवघे आयुष्य वेचले. जोतिबांना खंबीर साथ दिली. यावेळी पारितोषिक वितरण झाले. यावेळी प्रतिभा शिंदे, अनिल सावंत, अरूण आदलिंगे आदींनी मनोगत व्यक्त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)