“सावित्री’च्या लेकीचा “फोर्ब्स’यादीत “अंडर 30′ समावेश!

प्रभात वृत्तसेवा

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील बायोइन्फॉरमॅटिक्‍स व बायोटेक्‍नॉलॉजी विभागाच्या (आयबीबी) विद्यार्थिनी प्रियंका जोशी (वय 29) यांच्या संशोधनात्मक कार्याचा “फोर्ब्स’ या जगप्रसिद्ध नियतकालिकाने गौरव केला आहे.

प्रियंका या सध्या केंब्रिज विद्यापीठामध्ये “रिसर्च फेलो’ म्हणून काम करत आहेत. फोर्ब्सच्या “अंडर 30, सायन्स अँड हेल्थकेअर’ या अंकामध्ये विविध क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या युवा संशोधकांची (30 वर्षांखालील) यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या माध्यमामधून प्रियंका यांच्या संशोधनाचीही गौरवपूर्ण दखल घेण्यात आली आहे. प्रियंका यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठामधून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर केंब्रिज विद्यापीठामध्ये संशोधन करण्यास सुरुवात केली होती.
प्रियंका यांच्या संशोधनामुळे मानवी मेंदूतील लहान रेणुंच्या औषधे आणि चयापचय्यांना ओळखण्यावर लक्ष केंद्रित केले गेले. अलझायमर रोगाचे मूळ कारण समजले जाणारे अमाइलॉइड बीटा प्रथिने क्‍लंप तयार होण्याशी या प्रक्रियेचा निकटचा संबंध आहे. या संशोधनांतर्गत त्यांनी लहान रेणुंचा साठा (मॉलिक्‍युल लायब्ररी) तयार केली. यामधून केंब्रिज विद्यापीठामध्ये अल्झायमरवरील औषध तयार करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या संशोधनास बळ मिळाले, अशी माहिती विभागप्रमुख प्रा. अमिता रवीकुमार यांनी व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)