रांजणी -यंदाच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दयावान युवक सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने नुकतेच बारामती येथील सावली बाल अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना मोफत कपडे आणि खाऊचे वाटप करण्यात आले. 2014 साली दयावान सामाजिक प्रतिष्ठानची स्थापना आशिष खुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या प्रतिष्ठानमध्ये काम करत असलेले सर्व युवक उच्चशिक्षित असून, सामाजिक जनजागृतीवर प्रतिष्ठानने भर दिला आहे. प्रतिष्ठान राबवत असलेल्या उपक्रमामध्ये प्रामुख्याने वृक्षारोपण आणि गटशेतीची स्थापना करण्यात शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यावर अधिक भर दिला आहे. आधुनिक पद्धतीने शेतीला चालना देण्याविषयीचे आणि सुशिक्षित युवक युवतींना स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शन केले जात आहे. यंदा स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दयावान सामाजिक प्रतिष्ठानने बारामती येथील सावली बाल अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना कपडे आणि खाऊवाटप करून पर्यावरणाविषयी जनजागृतीचे महत्त्व पटवून दिले आणि परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक आशिष खुंटे, अध्यक्ष अमोल भोसले, राहुल भगकत मौली मार्कंड, शिवाजी दौंड, महादेव लोंढे, दादा वावरे, राहुल भगत, ओम ओंबासे, संतोष माळवे, दीपाली भोसले, गौरी झगडे, शिक्षक आमि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)