सावधान…डेंग्यूबाधितांची संख्या वाढतेय

प्रशासनासमोर आव्हान : चिकुनगुनियाचे रुग्णही वाढले


स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव काही अंशी कमी

पुणे – मागील दोन महिन्यांपासून स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव शहरात काही अंशी कमी झाला आहे. परंतू, डेंग्यूच्या डासांचा “डंख’ सुरू असल्यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय चिकनगुनिया आणि मलेरियाचे रुग्णही आढळून येत आहे. त्यामुळे प्लेटलेटला मागणी वाढली आहे.

मागील वर्षभरात (1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018पर्यंत) डेंग्यूचे 3 हजार रुग्ण सापडले असून ऑगस्ट, सप्टेंबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांत सर्वाधिक रुग्णांची संख्या आढळून आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डेंग्यूमुळे रुग्णांना प्लेटलेट्‌सची आवश्‍यकता अधिक असते. परंतू, काही ठिकाणी प्लेटलेट्‌सचा पुरवठा कमी असल्यामुळे नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे. शहरात आजही डेंग्यू डासांची पैदास होणारी ठिकाणे सापडत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यात आरोग्य विभागाला अजून म्हणावे तसे यश आले नाही. शहरात आवश्‍यक त्या ठिकाणी औषध फवारणी करणे आवश्‍यक आहे. परंतू, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात पाण्याचे साचलेले डबके स्वच्छ करावे. त्यामुळे डासांची डेंग्यूच्या डासांची पैदास होणार नाही, असे आवाहन केले जात आहे. त्याला काही अंशी प्रतिसादही मिळत आहे. मात्र, प्रशासकीय पातळीवर पाहिजे त्या प्रमाणात कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षभरात 2 हजार 939 डेंग्यूचे रूग्ण आढळून आले असून त्यामध्ये एकट्या ऑगस्ट -2018 मध्ये सर्वाधिक 589 रुग्ण आढळले आहे. तत्पूर्वी र्स्वान फ्लूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याने रुग्णांची संख्या दरमहा 400 च्या वर आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने वेळीच पावले उचलून डेंग्यू आणि मलेरियाच्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी औषध फवारणी, जनजागृती करून डासांचे पैदासाची ठिकाणे नष्ट करणे आवश्‍यक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)