सावधान ! जाॅन्सन एंड जाॅन्सनमुळे होऊ शकतो कॅन्सर..

जाॅन्सन एंड जाॅन्सन या प्रसिध्द अमेरिकन कंपनीच्या शेअरमध्ये 10 टक्क्यांनी घसरण झाली असून, 2002 नंतर प्रथमच कंपनीच्या शेअरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. राॅयटर्स या वृत्तसंस्थाच्या एका रिपोर्टनंतर कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाली.

राॅयटर्सच्या रिपोर्टनुसार, जाॅन्सन एंड जाॅन्सन या कंपनीच्या टैल्कम पाउडरमध्ये एस्बेस्टस आहे व एस्बेस्टसमुळे कॅन्सर सारखा भयानक आजार होऊ शकतो व या बाबतची माहिती जाॅन्सन एंड जाॅन्सन कंपनी गेली अनेक दशकांपासून माहिती आहे. दरम्यान, राॅयटर्सने आपल्या रिपोर्टमध्ये कंपनीच्या अंतर्गत कादगपत्रांचा अहवाल देत सांगितले आहे की, कंपनीच्या एग्जेक्यूटिव पासून ते मॅनेजर, वैज्ञानिक, डाॅक्टर आणि वकील यांना देखील या बाबतची माहिती होती. ही माहिती असून ही कंपनी गेली अनेक वर्ष या वस्तूची विक्री करत आहे. त्यांनी कंपनीच्या अनेक कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर समोर आले की, 1971 ते 2000 दरम्यान जाॅन्सन आणि जाॅन्सनच्या राॅ पाउडर आणि बेबी पाउडरच्या टेस्टमध्ये एस्बेस्टस असल्याची बाब अनेक वेळा समोर आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कंपनीने काॅस्मेटिक टॅल्कम पाउडरमध्ये एस्बेस्टसच्या प्रमाणाला मर्यादित दाखविण्यासाठी अमेरिकी आधिकाऱ्यांवर देखील दबाब बनवण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. यामध्ये त्यांना यश देखील आले. जाॅन्सन एंड जाॅऩ्सन कंपनीने राॅयटर्सचा हा रिपोर्ट चुकीचे असल्याचे म्हटले आहे. कंपनीने बेबी पाउडर सुरक्षित आणि  एस्बेस्टस फ्री असल्याचे म्हटले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)