सावधान ! चीनची अंतराळ प्रयोगशाळा पृथ्वीवर कोसळणार

बीजिंग : चीनची पहिली प्रायोगिक अंतराळ प्रयोगशाळा पुढील आठवड्यात पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 31 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान कधीही ही प्रयोगशाळा पृथ्वीला धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली. तियानगोंग-1 नावाच्या या प्रयोगशाळेचा कार्यकाळ जून 2013 मध्येच पूर्ण झाला होता. त्यामुळे ही प्रयोगशाळा पृथ्वीवर कोसळले असे म्हटले जात आहे.

मार्च 2016 पासून या प्रयोगशाळेकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. पृथ्वीवर कोणत्या ठिकाणी ही प्रयोगशाळा कोसळेल हे अचूकपणे सांगता येणार नाही. पृथ्वीला धडक देण्याच्या 2 तासांअगोदरच याचा अनुमान लावता येऊ शकतो, असे चीनच्या अंतराळ तज्ञाने सांगितले. चीनची ही प्रयोगशाळा अंतराळात स्वतःचे स्थानक स्थापन करण्यासंबंधी त्याच्या प्रकल्पाचा भाग आहे.  2022 पर्यंत अंतराळ स्थानक उभारण्याची चीनची योजना आहे. चीनने तियानगोंग-1 ला सप्टेंबर 2011 मध्ये प्रक्षेपित केले होते. ही प्रयोगशाळा पृथ्वीपासून 216.2 किलोमीटरवरील कक्षेत प्रदक्षिणा घालत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)