सावधान! उघड्यावर लघुशंका करणे पडेल महागात

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सर्वत्र मोठ्या प्रमाणात स्वच्छतागृहांची निर्मिती केली जात आहे. मात्र, तरिही अनेकजण उघड्यावर लघुशंका करत असल्याचे दिसते. मात्र, आता उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांची खैर नाही. कारण आपले शहर सुंदर आणि स्वच्छ बनवण्यासाठी अलाहाबाद महानगरपालिकेने एक नवी शक्कल लढवली आहे. मनपाने उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी ‘अँटी सू-सू’ टीम्स बनवल्या आहेत. या टीम्स शहरातील विविध परिसरात साध्या गणवेशात फिरणार असून उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत.

अँटी सू-सू टीम उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांचे फोटो क्लिक करणार आहेत. त्यानंतर हे फोटोज सोशल मीडियात आणि शहरातील चौका-चौकात चिटकवणार आहेत. यामुळे उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांना लाज वाटेल आणि पुन्हा असं करणार नाहीत असा यामागचा उद्देश आहे. अशाच प्रकारे उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

अलाहाबाद मनपाने शहार स्वच्छ करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. मनपा क्षेत्र पाच झोनमध्ये विभागलं असून यामध्ये पाच झोनल अधिकारी आणि १५ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.उघड्यावर लघुशंका करताना पकडल्यास दंड भरावा लागणार आहे. लघुशंका करताना पकडल्यास मनपा आरोपींवर २० रुपयांचा दंड ठोठावणार आहे. यासोबतच परिसर अस्वच्छ करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

अलाहाबाद मनपाने पकडलेल्या व्यक्तीला आपली चूक लक्षात यावी यासाठी शक्कल लढवली आहे. मनपा आयुक्त ऋतु सुहास यांच्या मते, या आरोपींना मनपातर्फे मिस्टर सू-सू कुमारचं प्रमाणपत्र देणार आहे. मनपाने गेल्या महिन्याभरात परिसर अस्वच्छ करणाऱ्यांवर कारवाई करत २.५ लाख रुपये दंड वसूल केला आहे. तर उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांकडून १० हजार रुपये वसूल केले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)