सावत्र आईसह दोघांवर गुन्हा

– नऊ वर्षीय मुलाचा लैंगिक छळ

पिंपरी – नऊ वर्षीय मुलाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी सावत्र आईसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. 27) वाशी, नवी मुंबई येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपासासाठी गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

-Ads-

या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी नवी मुंबई, वाशी येथील रबाले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मुलाची सावत्र आई व तिचे साथीदार मारुतराव कुंडलिकराव पठारे, श्रीधर मारुतराव पठारे यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा एप्रिल 2016 ते ऑगस्ट 2017 पर्यंत सावत्र आईकडे हिंजवडीला राहण्यास होता. या दरम्यान आरोपींनी त्यास गुंगीचे औषध देऊन मारहाण केली. तसेच त्याचा लैंगिक छळ केला असल्याचे वडिलांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सपना देवताळे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)