सावता महाराज पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम

चिंबळी- चिंबळी कुरूळी परिसरातील मोई, मोशी, निघोजे, केळगाव, मरकळ भागात दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चिंबळी येथील सावता महाराज मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे 5 वाजता काकड आरती, महापूजा करण्यात आली. दुपारी दोन वाजता महिलांचे भजन व सायंकाळी पाच वाजता सामुदायिक संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी सरपंच रामचंद्र कातोरे, ह. भ. प. सुभाष महाराज कातोरे, रंगनाथ बनकर, दत्तात्रय बनकर, एकनाथ बनकर, राजू विधाटे, नेमिनाथ बटवाल, काळूराम बनकर, समीर बनकर, ज्ञानेश्वर बनकर, शिवाजी बनकर, पांडुरंग बनकर, बाबासाहेब बनकर, संतोष सातव, मुरलीधर जाधव, रावजी जाधव, अर्जुन बनकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)