भवानीनगर – सावता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सावता परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य संघटक संतोष राजगुरु, जिल्हा परिषद सदस्य सागर भोसले, छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील व कार्यकारी अधिकारी गोंविद अनारसे, संचालक रणजित निंबाळकर, संभाजी ब्रिगेडचे कोषाध्यक्ष अमोल काटे, राष्ट्रवादीचे सरचणीस विनोद सपकळ, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सचिन सपकळ, भाजपचे तालुकाध्यक्ष जगदीश कोळेकर, राजाभाऊ जाधव, दत्तात्रय गुप्ते, शिवसेनेचे विजय शिरसट, अजित सोनवणे, पांडूरंग झगडे, दिपक नेवसे, अरुण वणवे, विष्णू शिंदे, गणेश जगताप, मोहन सुरुडकर, संतोष धोंडे, अमोल भोईटे आदी उपस्थित होते. यावेळी रविंद्र खवळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन सावता परिषदेचे इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष प्रकाश नेवसे यांनी केले. सुत्रसंचालन रविंद्र खवळे यांनी केले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा