सावता परिषदेचे संघटक राजगुरु यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

इंदापूर – सावता परीषदेचे मुख्य संघटक संतोष राजगुरु यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठी साहित्य विकास परीषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संमेलनात अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
अंथुर्णे येथे कै. भगवानराव भरणे साहित्य परिषदेने संमेलन आयोजित केले होते. यावेळी या पुरस्काराचे वितरण झाले. संतोष राजगुरू गेली 12 वर्षे ओबीसी अल्पसंख्यांक समाजाचे सावता परिषदेचे संस्थापक/अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यभर माळी समाजाचे संघटन करून संघर्ष करत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, सभापती प्रवीण माने, खरेदी विक्री संघाचे संचालक कोंडीबा भोंग आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मराठी विकास परिषदेचे अध्यक्ष विजय गायकवाड, उपाध्यक्ष अकबर शेख यांनी संमेलनाचे नियोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)